पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला आहे. गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याच्या धर्तीवर शिवरायांचा पुतळा देखी भव्यदिव्य उभारला जाईल. या पुतळ्याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागणार असून त्यांच्या निर्मितीसाठी शिल्पकार देखील निश्चित करण्यात आले असल्याचे सोनवणे यांनी सांगितलं आहे. या निर्णयाचं आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वागत केल आहे.
हेही वाचा…अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई, कोर्टात टिकणारं आरक्षण, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकर येथे दर्शनासाठी आले असता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज नागरिकांपर्यंत आपला संकल्प पोहचवण्यासाठी पुतळा उभारणीची माहिती माध्यमांसमोर देत असल्याचे शरद सोनवणे यावेळी म्हणाले. येत्या चार दिवसांत मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वेळ दिली असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. २९ सप्टेंबर रोजी आणखीन तीन महत्वाच्या घोषणा आणि पुतळा उभारणी कामाचा सविस्तर आराखडा मांडण्यात येईल. २९ सप्टेंबर २०२३ ते २९ सप्टेंबर २०२४ या एक वर्षाच्या दरम्यान शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…खोतकर, भुमरेंची जरांगेंसोबत चर्चा, जरांगे पाटील आज उपोषण मागे घेणार ?
त्यावर छत्रपती शिवाजी महाराज श्वास आहेत, ध्यास आहेत. पंचप्राण आहेत. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची घोषणा केली, त्याचे स्वागत करतो. या शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून सदैव सहकार्य आणि साथ असेल असं अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
हेही वाचा…तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार, आज महायुतीच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका
हेही वाचा..शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या ‘या’ अपक्ष आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, ठाकरे गटाची मोठी खेळी
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या,” संभाजी भिंडेंची मागणी