जालना : शासन आपल्या दारी कार्यक्रम आज जालन्यात होत आहे. त्याआधी मराठा आरक्षण प्रश्न मिटवण्यासाठी राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी अर्जून खोतकर, संदीपान भूमरे उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. यातच आज शिवप्रतिष्ठाने संभाजी भिडे देखील दाखल झाले आहेत. यातच काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे जरांगे पाटील आता काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यात”, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
आता मागे वळून पाहायचं नाही, जसं पाहिजे तसं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. जरांगे तुमचं आम्हाला कौतुक वाटतं आहे. तुमचा विजय नक्की होणार आहे. तुम्ही उपोषण थांबवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. फडणवीस, शिंदे आणि अजिदादांचं संभाजी भिडे यांच्याकडून कौतूक केलं आहे. त्याचबरोबर ही मंडळी फसवणूक करणारी नाही. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“महाराष्ट्रातले सगळे सध्या राजकारणी सत्तेला भूकेले, आग लावायची कामं सुरू,” मराठा आरक्षणावरून खोतांची टिका
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. जरांगे पाटलांची भूमिका १०१ टक्के योग्य आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेईमानी करणार नाहीत. तर आरक्षणाचा उद्देश पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचा आग्रह हा सत्याग्रह आहे. उपोषण थांबवा पण लढाई थांबू नका. शिवप्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धुरंदर आहेत. हवं ते मिळून देण्याची जबाबदारी मला द्यावी. असंही त्यांनी म्हटले.
हेही वाचा…अजित पवार गटातील विधान परिषदेतील ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू
दरम्यान, सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक आहेत. ही माणसं शब्द पाळतील. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे, असं आवाहनही संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्याचबरोबर जरांगे यांनी पुढची जबाबदारी माझ्यावर टाकावी असं देखील संभाजी भिडे यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई, कोर्टात टिकणारं आरक्षण, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…खोतकर, भुमरेंची जरांगेंसोबत चर्चा, जरांगे पाटील आज उपोषण मागे घेणार ?
हेही वाचा…“बावनकुळेंची तुलना अॅम्ब्रोज सोबत,” भाजपकडून जाधवांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा..चंद्रकांत पाटलांना हटवा अन् अजितदादांना अध्यक्ष करा; मराठा आरक्षणाच्या बैठकीत नेत्यांचा सूर!
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस, ठिक १२ वाजता ‘या’ दिवशी होणार सुनावणी