मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना आता विधान परिषद आमदारांच्या कारवाईसाठी देखील अर्ज दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा…Breaking News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे आमदार अपात्र करण्यासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एक अर्ज प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांच्या नावे तर दुसरा अर्ज शरद पवार गटाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नावे करण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांच्या नावाचा उल्लेख तर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अर्जात रामराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे.
हेही वाचा…“मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद”
दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर हे प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं आहे. दोन्ही गटातील नेत्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवल्या होत्या. त्यावर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपलं म्हणणं निवडणुक आयोगात दाखल केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून धंगेकरांची फडणवीसांवर जोरदार टिका, म्हणाले, घोषणा केल्या पण…,
हेही वाचा…“मराठा आरक्षण नाही तर शिक्षणही नाही, गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय”
हेही वाचा…जी-२० परिषदसाठी भारताने इतर देशापेक्षा केला प्रचंड खर्च, रशियाने फक्त 170 कोटीत आटोपला होता कार्यक्रम
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार, आज सर्वपक्षीय ‘या’ २३ नेत्यांची एकत्रित बैठक
हेही वाचा…“किती पापं लपवली, कशामुळे गेलात, हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही” वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक टोला