मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. राजकीय पक्षांचं मराठा समाजावर किती प्रेम आहे, ते आता समजेल, ते आता समजेल. असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. या समितीत राज्यातील जवळपास २३ पक्ष उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा…“ते तुम्ही सिद्ध केलं तर राजकारणातून निवृत्त होईल”, अजित पवारांनी दिलं चॅलेंज
मराठा आंदोलनाचा तिढा सोडवायचा कसा यासाठी राज्य सरकारने सांयकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यामध्ये काॅंग्रेसकडून अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले, काॅंग्रेसचे नेते नाना पटोले, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, राजेश टोपे यांना निमंत्रण देण्यात आले आहेत.
हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला, बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी पवारांची मोठी रणनिती
दरम्यान, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, शेकापचे जयंत पाटील, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, लोकभारती पक्षाचे कपिल पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, प्रहाराचे बच्चू कडू, मनसेचे राजू पाटील, अपक्ष आमदार रवी राणा, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे विनोद निकोले, माजी खासदार संभाजी राजे भोसले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, पीपल्स रिपल्बिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र गवई आणि राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव,विधी व न्याय विभागचे सर्व अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“किती पापं लपवली, कशामुळे गेलात, हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही” वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…Breaking News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!
हेही वाचा…“मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद”
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी