पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बंडखोर ४० आमदारांवर शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरण आता निवडणुक आयोगात गेल्याने राष्ट्रवादीत दोन्ही गटाची राजकीय लढाई सुरू झाली आहे. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपापले उमेदवार निश्चित केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही, याच..,”
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अनेक जण अजित पवार गटात सामील झालेत. यानंतर पक्षात मोठी फुट पडली. असं असलं तरी शरद पवारांनी नव्याने पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी कंबर कसली आहे. यातच आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाची शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू केली आहे.
हेही वाचा…भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी ! इंदिरेचा नातू आलाय.. आता चिंता नाही
दरम्यान, निवडणुक आयोगात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठवलेल्या अपात्रतेच्या यादीत पुण्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांच्या नावाचा समावेश असल्याने याठिकाणी शरद पवार नवीन उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. यातच आता चेतन तुपे यांनी भूमिका स्पष्टी केली नाही. मात्र ते अजित पवार गटात असल्याची शक्यता आहे. याठिकाणी आता शरद पवार गटाकडून शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला असल्याची चर्चा राजकारणात सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार”
हेही वाचा…“निवडणुकीपुर्वी देशात दंगली घडू शकतात,” शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?” शरद पवारांच्या शिलेदारांनी डिवचलं
हेही वाचा…नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश