पंढरपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पक्ष सक्रिय झाले असून त्याची जोरदार तयारी आता सुरू केली आहे. यातच राज्याचे क्रिडा आणि युवक कल्याण मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांनी शरद पवारांबाबत एक भाष्य केलं आहे. पंढरपुर दौऱ्यावर आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विधान केलं आहे.
हेही वाचा…भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी ! इंदिरेचा नातू आलाय.. आता चिंता नाही
आम्ही कुठेही असलो तरी आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार. त्यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो, असं संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे. राजकारण आणि समाजकारण करत असताना शरद पवार साहेब हा एकच आमचा विठ्ठल आहे, त्यांचा विचार घेऊन आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात पुढे जात आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सवयीप्रमाणे इथं पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करताहेत”, त्याप्रकरणावरून भाजपचा रोहित पवारांना टोला
दरम्यान, निवडणुक आयोगात आता राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरण गेल्यानंतर आता राजकीय लढाई सुरू झाली आहे. यातच आता अजित पवार गटातील आमदारांचे परतीचे दार आता बंद झाले आहेत. कारण अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांवर अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रकरण देखील जोरदार गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निवडणुकीपुर्वी देशात दंगली घडू शकतात,” शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?” शरद पवारांच्या शिलेदारांनी डिवचलं
हेही वाचा…नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही, याच..,”