जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्यारा मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी राज्य सरकारचा लिफाफा घेऊन आमदार अर्जुन खोतकर आंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. काल मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळाने देखील मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा केली आहे. यातच आता राज्य सरकारने मराठा आरक्षणबाबत नवीन जीआर काढला असून तो जीआर मनोज जरांगे पाटलांच्या समोर आज उघडण्यात आला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, उद्या कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार”
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाने सरकारसोबत चर्चा केली आहे. जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेली चर्चा सकारत्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तर मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे अजित पवारांनी म्हटलं आहे. दोन वेगवेगळ्या सरकारने आरक्षण दिले. मात्र एक हायकोर्टात टिकू शकले नाही. तर दुसरे सुप्रिम कोर्टात टिकू शकले नाही. हे आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही याचा अभ्यास केला जात असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा…शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, राहुल नार्वेकर घेणार मॅरेथॉन सुनावणी
दरम्यान, सात सप्टेंबर 20२3 रोजी काढलेल्या जीआर वंशावळ असलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील त्यावर आमचं सरसकट मराठा समाजाला कुणबी मला प्रमाणपत्र देण्यात यावा अशी आमची मागणी होती एक जून 2004 चा मराठा आरक्षण संदर्भात जीआर आहे तो जर काम करत नव्हता.तेव्हापासून एकही प्रण्माणपक्षत्र मिळालं नाही. २००४ च्या जीआरच्या दुरुस्त्या करून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी आम्ही केली होती. खोटे गुन्हे मागे घेण्यात सांगितले होते, परंतु त्यावरील प्रक्रिया सुरू केली नाही. तसेच जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्या वर एकही बडतर्फेची कारवाई करण्यात आली नाही. आता पर्यंत एकही कारवाई करण्यात आली नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी ! इंदिरेचा नातू आलाय.. आता चिंता नाही
हेही वाचा…“सवयीप्रमाणे इथं पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करताहेत”, त्याप्रकरणावरून भाजपचा रोहित पवारांना टोला
हेही वाचा…१७ तारखेपासून ‘या’ ओबीसी नेत्याचा अन्नत्याग उपोषण, राज्य सरकारला दिला जोरदार इशारा
हेही वाचा…मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण.., ओबीसी नेते आक्रमक, उद्यापासून राज्यात आंदोलन करणार
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये पोहचले अन्, राजस्थानमधील काॅंग्रेसचा बडा नेता शिवसेनेत दाखल