मुंबई : आमदार अर्जून खोतकर यांनी राज्य सरकारचा जीआर घेऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, अर्जून खोतकर यांनी सरकारकडून आणलेल्या जीआरमध्ये दाखले कधीपासून मिळणार याचा उल्लेख केला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. सरकारच्या जीआरने मनोज जरांगे पाटलांचं समाधान न झाल्याने त्यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलं आहे. मात्र आता दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील आक्रमक भुमिका घेतली आहे.
हेही वाचा…“त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..,” छत्रपतींची वाघनखं इंग्लंडला आणायला जाणाऱ्या मुनगंटीवारांना नाना पाटेकरांचा टोला
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध सुरू केला आहे. ओबीसीचं उद्यापासून राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये काल झालेल्या बैठकीत पण ओबीसी नेत्यांनी विरोधाचा सुर आळवला होता. यातच उद्यापासून संपुर्ण राज्यात आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
हेही वाचा…ठाकरेचा मुंबईतील ‘हा’ शिलेदार अडचणीत, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हा दाखल
दरम्यान, आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा आमचा पाठिंबा आहे. पण त्यांना मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. संवैधानिका पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये पोहचले अन्, राजस्थानमधील काॅंग्रेसचा बडा नेता शिवसेनेत दाखल
हेही वाचा…“अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, उद्या कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार”
हेही वाचा…शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, राहुल नार्वेकर घेणार मॅरेथॉन सुनावणी
हेही वाचा…शरद पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलं उत्तर, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“बैठका होत असतात, चर्चा होत राहतील, मला काही ताण नाही”, मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम