मुंबई : कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इडीने किशोरी पेडणेकर , माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, माजी महापालिका उपायुक्त, खासगी कंत्राटदार वेदांन्ता इनोटेक आणि अनोळखी सरकारी अधिकाऱ्याविरोधात मनी लॉंडरिंग अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याचा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल…,” प्रकाश आंबडेकरांचे मोदींना पाच सवाल
कथित ४९.६३ लाखांच्या बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरमी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ४ ऑगस्टला पेडणेकरांसह, माजी अधिकारी आणि अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लवकर ईडीकडून पेडणकरांसह इतरांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
हेही वाचा…सरकारचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी स्विकारला, जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना
दरम्यान, राज्यात शिवसेना पक्ष फुट प्रकरणानंतर ठाकरे गटातील अनेक नेते अडचणीत आले आहेत. यातच आता किशोरी पडणेकरांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आगामी काही काळात याप्रकरणाबाबत काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकरही म्हणतात नेमकं काय घडणार?
हेही वाचा…G-20..! ₹१२,४३,९८,९७,५०,०००! बायडनला भारतात आणण्याची किंमत आहे का ही मोदी ?
हेही वाचा…G-20 मध्ये मोदी साहेब 25-30 लाखांचा सूट बूट घालून पाहुण्यांचे स्वागत करतायत, दुसरीकडे गरिबांचे पैसे हिसकावून घेतायेत
हेही वाचा…पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने मारली बाजी, भाजपला फक्त तीन जागा, पाहा निकाल
हेही वाचा…सल्ला देण्याची सवय काकडेंच्या अंगलट, नितेश राणेंनी चांगलेच झापले