पुणे : पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या दर्ग्याचे बांधकाम पाडण्याच्या मागणीवरून भाजपने नेत्यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला. त्यात भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जोरदार आंदोलन देखील करण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट धमकीच दिली. यावरून पालिकेतील वातावरण तापून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांचा निषेध व्यक्त केला. तर यावरून आता माजी खासदार संजय काकडे आणि नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
हेही वाचा…फडणवीसांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, भाजपची मुंबईत तातडीची बैठक
पुण्यातील घटनेवरून संजय काकडे यांनी नितेश राणे यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांना सुनावलं. कोणी कापाकापीची भाषा करीत असतील तर त्याचा मी निषेध व्यक्त करतो. बेकायदा बांधकामांवर अधिकारी कारवाई करतील हे असे सांगून काकडे यांनी राणे यांना सल्ला दिला. तेवढचे नव्हे तर नितेश राणे यांना त्यांची किंमत मोजावी लागणार असा सुर देखील त्यांनी आवळला. त्यावर नितेश राणे यांनी संजय काकडे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार
मी पक्षाचे काम करतो आहे. आपण सल्ला देणारे कोण, तक्रार कशी काय करता, पक्षाचा अजेंडा ठाऊक आहे का ? असे राणे स्टाईलचे आठ दहा सवाल करीत नितेश राणे यांनी संजय काकडे यांची बोलती बंद केली. यासंदर्भात एका न्युज पोर्टलने बातमी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल…,” प्रकाश आंबडेकरांचे मोदींना पाच सवाल
हेही वाचा…सरकारचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी स्विकारला, जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…अन् ठाकरेंच्या हातात ठेवली लहान मुलानं लोणचं आणि भाकरीची शिदोरी, म्हणाले, हीच आमची..,