मुंबई : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत आजपासून जी २० शिखर परिषदेची बैठक होत आहे. काल जवळपास सगळ्याच देशातील प्रमुख नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्न विचारत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल चिकटवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे काही प्रश्न आहेत. असं म्हणत त्यांनी ट्विट केले आहे.
हेही वाचा…“आमची भाजी भाकरी ओढू नका, ती हिसाकावू नका”, मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षण पेटणार
इंडोनेशियामध्ये झालेल्या ASEAN शिखर संमेलनात भाषण करताना नरेंद्र मोदींनी कितीदा चीनचा उल्लेख केला? रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्लीतल्या G20Summit कडे पाठ का फिरवली आहे, हे मोदी सांगू शकतील का? रशिया आणि चीनला मान्य व्हावे म्हणून युक्रेन युद्धावरच्या परिच्छेदात भारताने सुचवलेले बदल अमेरिका, इंग्लंड, युरोपियन युनियन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी धुडकावून लावले आहेत हे खरे आहे का? असे सवाल त्यांनी केले आहे.
हेही वाचा…“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले,” प्रकाश आंबेडकरांची टिका
तसेच वर्षभराच्या अध्यक्षीय काळात चीन आणि रशियाचा विरोध पाहता युक्रेन युद्धाचा साधा उल्लेख असणारे किती संयुक्त निवेदने किंवा सर्वानुमते दस्तावेज निघाले?दिल्लीतल्या संमेलनात कोणत्याच नेत्यांची घोषणा न होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे का? ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची घोषणा जाहीर होऊ शकला नाही, असा पहिला देश बनण्याची नामुष्की भारतावर ओढवणार आहे का? आणि यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की होणार नाही का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.
6 राज्यातल्या 7 विधानसभा जागांसाठी आज पोटनिवडणूक निकाल जाहीर
INDIA-4 vs BJP- 3
उत्तर प्रदेशातल्या घोसीमध्ये समाजवादीचे विद्यमान आमदार दारा सिंह चौहान पक्ष बदल करून भाजपमध्ये गेले होते
INDIA आघाडीने तिथे एकत्रित उमेदवार दिला, त्यांचा पराभव
उत्तर प्रदेश आणि झारखंड दोन्ही…
— Prashant Kadam (@_prashantkadam) September 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सरकारचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी स्विकारला, जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
हेही वाचा…अन् ठाकरेंच्या हातात ठेवली लहान मुलानं लोणचं आणि भाकरीची शिदोरी, म्हणाले, हीच आमची..,
हेही वाचा…फडणवीसांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या, भाजपची मुंबईत तातडीची बैठक