मुंबई : सरकारने नागपूर जिल्ह्यात जी २० परिषदसाठी २५० कोटींचा खर्च केला. मेरी माटी, मेरा देश कार्यक्रमासाठी १३ कोटी खर्च केले. मात्र दुसरीकडे शिक्षक नसल्याने कंत्राटी शिक्षकांसाठी ५ कोटींचा निधी मिळत नाही. समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठी जिल्ह्या परिषदेला मिळालेला २ कोटींचा निधी शासनाने परत मागितला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
सरकार हे वागणं बरं नाय, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या निधीवर डल्ला मारणं बरं नाय असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. एकट्या नागपूर जिल्ह्यात तुम्ही जी २० साठी २५० कोटी रूपये उधळले, इतर शहरांचा हिशोब न लावलेले बरे. एकट्या नागपूर जिल्ह्यात मेरी माटी- मेरा देशच्या जाहिरातीसाठी १३ कोटी रूपये उधळले, इतर शहारांचा हिशोब न लावलेले बरे. असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
हेही वाचा…अन् ठाकरेंच्या हातात ठेवली लहान मुलानं लोणचं आणि भाकरीची शिदोरी, म्हणाले, हीच आमची..,
दरम्यान, G-20 मध्ये पंतप्रधान मोदी साहेब 25-30 लाखांचा सूट बूट घालून पाहुण्यांचे स्वागत करतायत, झगमग फोटो काढतायत, सोन्याच्या ताटात, चांदीच्या चमच्याने जेवण करतायत. आणि इकडे देशातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे तुम्ही हिसकावून घेतायत. सरकार… हे वागणं खरंच बरोबर नाय. असंही त्यांनी म्हटले आहे.
सरकार हे वागणं बरं नाय,
गोरगरीब विद्यार्थ्यांच्या निधीवर डल्ला मारणं बरं नाय !एकट्या नागपूर जिल्ह्यात तुम्ही G-20 साठी 250 कोटी रुपये उधळले, इतर शहरांचा हिशोब न लावलेले बरे.
एकट्या नागपूर जिल्ह्यात मेरी माटी – मेरा देश च्या जाहिरातीसाठी 13 कोटी रुपये उधळले, इतर शहरांचा… pic.twitter.com/k1uk16pznv
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने मारली बाजी, भाजपला फक्त तीन जागा, पाहा निकाल
हेही वाचा…सल्ला देण्याची सवय काकडेंच्या अंगलट, नितेश राणेंनी चांगलेच झापले
हेही वाचा…“कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल…,” प्रकाश आंबडेकरांचे मोदींना पाच सवाल
हेही वाचा…सरकारचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी स्विकारला, जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय