पुणे : महाराष्ट्राचे राजकारण हे सद्या दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये रात्रीत झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
हेही वाचा…सरकारचा प्रस्ताव जरांगे पाटलांनी स्विकारला, जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना
नागरिकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केवळ काही वाक्य लिहून उभारले जाणारे फ्लेक्स कायम चर्चेचा विषय बनतात. यामध्येच एखाद्या नेत्याने अशा पद्धतीने बॅनर्स उभारल्यास काहीतरी राजकीय घडामोड घडणार, हे मात्र नक्की. जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांच्याकडून लावण्यात आलेले फ्लेक्स सद्या मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. “29 सप्टेंबर 2023 सर्वात मोठी घोषणा होणार” असा मजकूर लिहिण्यात आलेल्या फ्लेक्समुळे जुन्नरच्या राजकारणात चर्चेला उधाण आल आहे.
हेही वाचा…राजकारण तापणार, उद्यापासून आंदोलनाला सुरूवात, ओबीसी नेत्यांच्या बैठकीत निर्णय
एका बाजूला राज्यातील राजकारण अस्थिर बनले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आणि या गटामध्ये जाण्यावरून विद्यमान आमदार अतुल बेनके यांची असलेली संभ्रमावस्था, यावरून सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. आता शरद सोनवणे हे नवीन काय घोषणा करणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…G-20..! ₹१२,४३,९८,९७,५०,०००! बायडनला भारतात आणण्याची किंमत आहे का ही मोदी ?
हेही वाचा…G-20 मध्ये मोदी साहेब 25-30 लाखांचा सूट बूट घालून पाहुण्यांचे स्वागत करतायत, दुसरीकडे गरिबांचे पैसे हिसकावून घेतायेत
हेही वाचा…पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने मारली बाजी, भाजपला फक्त तीन जागा, पाहा निकाल
हेही वाचा…सल्ला देण्याची सवय काकडेंच्या अंगलट, नितेश राणेंनी चांगलेच झापले
हेही वाचा…“कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल…,” प्रकाश आंबडेकरांचे मोदींना पाच सवाल