पुणे : इंग्लंडच्या वास्तुसंग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहे. वाघनखं भारतात आणण्यासाठी एक खास आदेश काढण्यात येणार असून त्यासाठी भारत ५९ लाख रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यावर आता प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…सल्ला देण्याची सवय काकडेंच्या अंगलट, नितेश राणेंनी चांगलेच झापले
इंग्लंडमध्ये असलेली वाघनखं आणायला नोव्हेंबर महिन्यात जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यासाठी भारत ५० लाख रूपये खर्च करणार आहे. यावर आता नाना पाटेकर यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन. जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा. असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“कुठला विश्वगुरू अन् कसला विश्वगुरू. स्वतःला विश्वगुरूचं लेबल…,” प्रकाश आंबडेकरांचे मोदींना पाच सवाल
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानचा कोथळा या वाघनखांनी बाहेर काढला होता. त्यावेळी ही वाघनखं इंग्लंडला नेण्यात आली. त्याचसोबत भारतातील अनेक जुन्या गोष्टी इंग्लंडला नेण्यात आली. त्यासाठी आता भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. यातच आता वाघनखं भारतात परत आणावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्या मागणीला आता यश आले आहे.
मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन…
जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा….— Nana Patekar (@nanagpatekar) September 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेचा मुंबईतील ‘हा’ शिलेदार अडचणीत, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हा दाखल
हेही वाचा…“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकरही म्हणतात नेमकं काय घडणार?
हेही वाचा…G-20..! ₹१२,४३,९८,९७,५०,०००! बायडनला भारतात आणण्याची किंमत आहे का ही मोदी ?
हेही वाचा…G-20 मध्ये मोदी साहेब 25-30 लाखांचा सूट बूट घालून पाहुण्यांचे स्वागत करतायत, दुसरीकडे गरिबांचे पैसे हिसकावून घेतायेत
हेही वाचा…पोटनिवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने मारली बाजी, भाजपला फक्त तीन जागा, पाहा निकाल