पुणे : पुण्यातील अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. याआधी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनर पुण्यात लावण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकरही म्हणतात नेमकं काय घडणार?
यातच पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी रॅली होणार आहे. यनिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे संचेती हॉस्पिटल ते कात्रज या मार्गांवर 10/10 चे 25 बॅनर सर्वसामान्याच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आले आहेत. त्याआधी बारामती तालुक्यातील सुपे येथील हज़रत सय्यद ख्वाजा शाह मन्सूर आरिफ बिल्लाह रहै. दर्ग्याचे अजित पवारांनी दर्शन घेतले.
हेही वाचा…G-20..! ₹१२,४३,९८,९७,५०,०००! बायडनला भारतात आणण्याची किंमत आहे का ही मोदी ?
दरम्यान, शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करावं. गरीब कुटुंबापर्यंत चांगलं आणि दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याची जबाबदारी शिक्षकांची असून त्यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा उत्तमरीतीनं शिकवता यावी यासाठी ती भाषा आत्मसात करावी आणि चांगले उपक्रम राबवावेत. कौशल्याचे आणि नैतिकतेचे शिक्षण देऊन विद्यार्थी गुणवंत, ज्ञानवंत आणि चारित्र्यसंपन्न व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहेच परंतु जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होतील या दृष्टीकोनातून अधिक प्रयत्नांची गरज आहे. असं यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमात सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, राहुल नार्वेकर घेणार मॅरेथॉन सुनावणी
हेही वाचा…शरद पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलं उत्तर, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“बैठका होत असतात, चर्चा होत राहतील, मला काही ताण नाही”, मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम
हेही वाचा…“त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..,” छत्रपतींची वाघनखं इंग्लंडला आणायला जाणाऱ्या मुनगंटीवारांना नाना पाटेकरांचा टोला
हेही वाचा…ठाकरेचा मुंबईतील ‘हा’ शिलेदार अडचणीत, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हा दाखल