मुंबई : राजस्थान राज्यातील माजी मंत्री आणि लाल डायरीमुळे विशेष चर्चेत आलेले आमदार राजेंद्र सिंह गुडा यांनी आज राजस्थान येथील झुनझुन जिल्ह्यात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी राजेंद्र सिंह गुडा यांचं एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…ठाकरेचा मुंबईतील ‘हा’ शिलेदार अडचणीत, कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी इडीकडून गुन्हा दाखल
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे तर राजस्थान ही महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे या दोन्ही राज्याचे एकमेकांशी शूरतेचे नाते असल्याचे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचे शिलेदार ३२ राज्यांमध्ये काम करत असून गुडा यांच्या प्रवेशामुळे राजस्थान राज्यातील शिवसेनेला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा शिंदेंनी व्यक्त केली.
हेही वाचा…“लवकरच मोठी घोषणा…” शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकरही म्हणतात नेमकं काय घडणार?
राजेंद्र सिंह गुडा हे कायम सत्यासाठी लढत आले असून सत्तेसाठी कधीच लढले नाहीत, सत्यासाठी त्यांनी सत्तेला लाथ मारली. मी देखील माझ्या ४० आमदारांच्या साथीने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी सत्तेवर लाथ मारून बाहेर पडलो हे आमच्यात साम्य असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी राजस्थान राज्यातील रुग्णांच्या सेवेकरता शिवसेनेच्या वतीने ५ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. राजेंद्र सिंह गुडा यांचे सुपुत्र शिवम गुडा यांचा वाढदिवस असल्याने त्यांना देखील यासमयी शुभेच्छा दिल्या. तसेच केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे राजस्थान राज्यप्रमुख लाखनसिंह पवार, ओमसिंह चारण, श्यामप्रताप सिंह, प्रतापसिंह चौहान आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, उद्या कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार”
हेही वाचा…शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, राहुल नार्वेकर घेणार मॅरेथॉन सुनावणी
हेही वाचा…शरद पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलं उत्तर, राजकीय चर्चांना उधाण
हेही वाचा…“बैठका होत असतात, चर्चा होत राहतील, मला काही ताण नाही”, मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम
हेही वाचा…“त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..,” छत्रपतींची वाघनखं इंग्लंडला आणायला जाणाऱ्या मुनगंटीवारांना नाना पाटेकरांचा टोला