पुणे : इंग्लंडच्या वास्तुसंग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहे. वाघनखं भारतात आणण्यासाठी एक खास आदेश काढण्यात येणार असून त्यासाठी भारत ५९ लाख रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. त्यावर आता भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलं उत्तर, राजकीय चर्चांना उधाण
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक वस्तू भारतात परत आणण्यासंदर्भातील मुद्दा मी विधिमंडळात विविध आयुधांच्या माध्यमातून अनेकदा मांडला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्यासोबत देखील अनेकदा बैठका घेऊन पाठपुरावा केला. अलीकडेच झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन पत्र व निवेदने दिली होती. आता वाघनखे भारतात येणार हे ऐकुन माझ्यासारख्या लाखो शिवप्रेमींना आनंद झाला आहे. वाघनख्यांसोबतच सरकारने महाराजांची जगदंबा तलवार व महाराजांशी निगडित इतरही शौर्याची मानके परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत हीच विनंती. असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“बैठका होत असतात, चर्चा होत राहतील, मला काही ताण नाही”, मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम
दरम्यान, रोहित पवारांनी ट्विट केल्यानंतर त्यावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी आयत्य बिळावर नागोबा अशी म्हणत वापरली आहे. तसेच ६ डिसेंबर २०२२ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी प्रयत्न केले, आणि आता त्याला यश येत आहे. तर सवयीप्रमाणे रोहित पवार इथ पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करत आहे. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
“आयत्या बिळावर नागोबा”
६ डिसेंबर २०२२ रोजी देवेंद्रजी यांनी अमितजी शहा यांच्याशी चर्चा करून शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी प्रयत्न केले, आणि आता त्याला यश येत आहे तर सवयीप्रमाणे @RRPSpeaks इथ पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करत आहे.https://t.co/l9XbHBsR2E https://t.co/zmy74WvYCC pic.twitter.com/2a6zjowFrx
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…१७ तारखेपासून ‘या’ ओबीसी नेत्याचा अन्नत्याग उपोषण, राज्य सरकारला दिला जोरदार इशारा
हेही वाचा…मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण.., ओबीसी नेते आक्रमक, उद्यापासून राज्यात आंदोलन करणार
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये पोहचले अन्, राजस्थानमधील काॅंग्रेसचा बडा नेता शिवसेनेत दाखल
हेही वाचा…“अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, उद्या कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार”
हेही वाचा…शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, राहुल नार्वेकर घेणार मॅरेथॉन सुनावणी