नागपूर : आमदार अर्जून खोतकर यांनी राज्य सरकारचा जीआर घेऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, अर्जून खोतकर यांनी सरकारकडून आणलेल्या जीआरमध्ये दाखले कधीपासून मिळणार याचा उल्लेख केला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. सरकारच्या जीआरने मनोज जरांगे पाटलांचं समाधान न झाल्याने त्यांनी आपलं उपोषण सुरूच ठेवलं आहे. मात्र आता दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील आक्रमक भुमिका घेतली आहे.
हेही वाचा…“बैठका होत असतात, चर्चा होत राहतील, मला काही ताण नाही”, मराठा आरक्षणावर जरांगे पाटील ठाम
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, यामागणीसाठी आता ओबीसी नेते उपोषणाला बसणार आहेत. राष्ट्रीय युवा महासंघाचे चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष रविंद्र टोंगे सोमवारपासून सकाळी अकरा वाजेपासून उपोषणला बसणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत. 16 तारखेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, असे स्पष्ट केले नाही आणि त्यासंदर्भात परिपत्रक काढत नाही. त्यानंतर १७ तारखेपासून संपुर्ण राज्यात जिल्ह्याधिकारी कार्यालयावर आंदोलने काढणार असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा…“त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..,” छत्रपतींची वाघनखं इंग्लंडला आणायला जाणाऱ्या मुनगंटीवारांना नाना पाटेकरांचा टोला
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने विरोध सुरू केला आहे. ओबीसीचं उद्यापासून राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये काल झालेल्या बैठकीत पण ओबीसी नेत्यांनी विरोधाचा सुर आळवला होता. यातच उद्यापासून संपुर्ण राज्यात आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण.., ओबीसी नेते आक्रमक, उद्यापासून राज्यात आंदोलन करणार
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये पोहचले अन्, राजस्थानमधील काॅंग्रेसचा बडा नेता शिवसेनेत दाखल
हेही वाचा…“अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, उद्या कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार”
हेही वाचा…शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, राहुल नार्वेकर घेणार मॅरेथॉन सुनावणी
हेही वाचा…शरद पवार गटाने निवडणुक आयोगात सादर केलं उत्तर, राजकीय चर्चांना उधाण