नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. यातच आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फुट पडल्याने पक्ष प्रवेश करणाऱ्याचा प्रमाण वाढलं आहे. यातच नाशिक येथील मनसेचा आमदारांनी मनसेने जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नाशकात शरद पवारांची ताकद वाढल्याची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये पोहचले अन्, राजस्थानमधील काॅंग्रेसचा बडा नेता शिवसेनेत दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल नाशिकचे मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत पूजा मोरे यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नाशकात शरद पवारांनी मनसेला खिंडार पाडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. त्यानंतर २०१२ च्या महापालिका निवडणुकीतही नाशिक करांनी महापालिका मनसेच्या ताब्यात दिली होती. त्यात नितीन भोसले यांचा सिंहाचा वाटा होता.
हेही वाचा…“अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, उद्या कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार”
दरम्यान, 2014 च्या मोदी लाटेत नाशकातील मनसेचे सर्व नेते वाहून गेलेत. त्यानंतर पक्षाला हळूहळू गळती लागली, अजूनही मनसेतील जुने जाणते नेते पक्ष सोडून जात आहे. यातच आता नितीन भोसले यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यातच काही दिवसांपुर्वी शिर्डी मतदार संघाच्या प्रमुख पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले बबनराव घोलप यांनी शिवसेना पक्षाचा उपनेते पदाचा राजीनामा दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह पूजा मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार… pic.twitter.com/x4jnRqg5qo
— NCP (@NCPspeaks) September 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही, याच..,”
हेही वाचा…भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी ! इंदिरेचा नातू आलाय.. आता चिंता नाही
हेही वाचा…“सवयीप्रमाणे इथं पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करताहेत”, त्याप्रकरणावरून भाजपचा रोहित पवारांना टोला
हेही वाचा…१७ तारखेपासून ‘या’ ओबीसी नेत्याचा अन्नत्याग उपोषण, राज्य सरकारला दिला जोरदार इशारा
हेही वाचा…मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण.., ओबीसी नेते आक्रमक, उद्यापासून राज्यात आंदोलन करणार