मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची काल कोल्हापुरात जाहीर सभा पार पडली. या सभेच्या आधी अजित पवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला उत्तरसभा म्हणून अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेत मंत्री हसन मुक्षीफ यांनी भाषण केलं. त्यावर आता राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हसन मुक्षीफ यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं.
हेही वाचा…मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण.., ओबीसी नेते आक्रमक, उद्यापासून राज्यात आंदोलन करणार
कोल्हापुराच्या सभेतल हसन मुश्रीफांनी सत्तेत का सामील झालो, याचे स्पष्टीकरण दिले. त्यात त्यांनी आजची सभा कोल्हापुरच्या विकासासाठी व प्रलंबित कामांसाठी आहे. असं हसन मुश्रीफ म्हणाले. त्यावर हसन मुश्रीफ यांना इतकी वर्ष शरद पवारांनी आमदार केलं, मंत्री केलं. तेव्हा का नाही केला विकास? का राहिलेत कामं प्रलंबित ? असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला.
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये पोहचले अन्, राजस्थानमधील काॅंग्रेसचा बडा नेता शिवसेनेत दाखल
दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसाला भावूक झालेले मुश्रीफ, साहेबांनी मला कसं शून्यातून उभं केलं याचा पाढा वाचणारे मुश्रीफ. अन् आज ज्यांनी घरावर ईडीच्या धाडी टाकल्या त्यांच्यासोबत सत्ता उपभोगतांना साहेबांसोबत केलेली गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?असा खोटक टोलाही त्यांनी हाणला. तसेच विरोधी पक्षात राहून कामं होत नाहीत ही सबब म्हणजे कवेळ आजच्याच गद्दारीचं स्पष्टीकरण नाही, तर उद्याच्याही गद्दारीचं आयतं कारण आहे. आज यांची सत्ता आहे. म्हणून आम्ही यांच्यासोबत आहोत, उद्या त्यांची सत्ता आली तर आम्ही त्यांच्यासोबतही जाऊ कारण विरोधी पक्षात राहून कामं होत नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला.
आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाला भावूक झालेले मुश्रीफ, साहेबांनी मला कसं शून्यातून उभं केलं याचा पाढा वाचणारे मुश्रीफ…. अन आज ज्यांनी घरावर ईडीच्या धाडी टाकल्या त्यांच्यासोबत सत्ता उपभोगताना साहेबांसोबत केलेली गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ…
कोणते मुश्रीफ खरे अन कोणते खोटे ? pic.twitter.com/azpYlFesz9— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) September 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही, याच..,”
हेही वाचा…भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी ! इंदिरेचा नातू आलाय.. आता चिंता नाही
हेही वाचा…“सवयीप्रमाणे इथं पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करताहेत”, त्याप्रकरणावरून भाजपचा रोहित पवारांना टोला
हेही वाचा…१७ तारखेपासून ‘या’ ओबीसी नेत्याचा अन्नत्याग उपोषण, राज्य सरकारला दिला जोरदार इशारा