मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्या राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच आता राज्यात ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षणासाठी देखील जनता रस्त्यावर उतरल्याने राज्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यातच आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. यात आता काय चर्चा झाली. ते पाहणं महत्वाचं ठरलं आहे. परंतु आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा…“मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय”, उद्धव ठाकरे
इंद्रा साहनी खटल्यातील ५० टक्के मर्यादा उठवल्याशिवाय आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊच शकत नाही हे सर्वश्रूत आहे. मराठा, धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी घटना दुरूस्ती करणे, ईव्हीएससाठी अशा प्रकारची घटना दुरूस्ती नुकतीच केंद्र सरकारने केलेली आहे. त्याच प्रकारची घटना दुरूस्ती नव्याने करायची आहे. असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?” शरद पवारांच्या शिलेदारांनी डिवचलं
दरम्यान, आरक्षण मर्यादा वाढवण्यास कोणाचा विरोधही नाही आणि शिवाय १८ सप्टेबर पासून संसदेचे विशेष अधिवेशन देखील आहे. त्यामुळे संसदेच्या येणाऱ्या विशेष अधिवेशनात हा विषय कायमचा मार्गी निघू शकतो, परंतु त्यासाठी आवश्यकता आहे, केवळ राजकीय इच्छाशक्तीची. गरज पडल्यास राज्यशासनाने देखील त्वरित विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून आरक्षण मर्यादा वाढवण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांचा ठराव पास करून केंद्राकडे पाठपुरावा करावा. सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर केंद्र सरकार नक्कीच राज्याची मागणी मान्य करेल. त्यामुळे राज्यशासनाने वेळ न दडवता ५०% आरक्षण मर्यादा उठवण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी असं रोहित पवारांनी म्हटलं.
इंद्रा साहनी खटल्यातील ५० % मर्यादा उठवल्याशिवाय आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊच शकत नाही हे सर्वश्रुत आहे. #मराठा, #धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती करणे. #EWS साठी अशा प्रकारची घटना दुरुस्ती नुकतीच केंद्र…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“ते तुम्ही सिद्ध केलं तर राजकारणातून निवृत्त होईल”, अजित पवारांनी दिलं चॅलेंज
हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला, बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी पवारांची मोठी रणनिती
हेही वाचा…“आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार”
हेही वाचा…“निवडणुकीपुर्वी देशात दंगली घडू शकतात,” शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा मोठा दावा