कोल्हापूर : राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभांचा धडाका सुरू करून दिला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाच्या देखील जोरदार सभा होत आहेत. यातच काल कोल्हापुरात अजित पवार गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेतून अजित पवार गटातील नेत्यांनी विरोधकांनावर जोरदार निशाणा साधला. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आवाहन दिलं आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला, बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी पवारांची मोठी रणनिती
कोणी काहीही म्हणू देत, कितीही इमानदारीची भाषा करू देत. आमच्याकडेही पुरावे आहेत. कोण कशासाठी गेला आहे? कोण सत्तेसाठी गेला ? कोण सेवेसाठी गेला? कोण विकासासाठी गेलाय आणि कोण संस्थांच्या दबावात गेला आहे? आमच्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. योग्य वेळी, आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या गोष्टी, कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघडं करू. त्यामुळे विरोधकांना तुम्ही जी धमकी देताय, इशारे देताय, ते सहन करण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आम्ही नाही. तसेच तुम्ही किती पापं लपवली तरी कशामुळे गेलात हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही. असंही ते म्हणाले. अस विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार”
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते, त्याचवेळेस राष्ट्रवादीच्या १ ते २ आमदार वगळता सर्व मंत्री, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. या पत्रात आपण महायुतीत सामील व्हावं असं म्हटलं होते. हे खोटे असले तर राजकारणातून निवृत्त होईल आणि हे खरे असले तर जे खोटे बोलतायेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे. असं आवाहन अजित पवारांनी विरोधकांना दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…Breaking News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!
हेही वाचा…“मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद”
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हेही वाचा…“ते तुम्ही सिद्ध केलं तर राजकारणातून निवृत्त होईल”, अजित पवारांनी दिलं चॅलेंज