जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांची एक टीम देखील अंतरवाली सराटे गावात पोहचली आहे. परंतु उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांनी नकार दिला आहे. मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद आहे. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“निवडणुकीपुर्वी देशात दंगली घडू शकतात,” शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा मोठा दावा
मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. राजकीय पक्षांचं मराठा समाजावर किती प्रेम आहे, ते आता समजेल, ते आता समजेल. असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.
हेही वाचा…“मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय”, उद्धव ठाकरे
दरम्यान, मराठा समाजाने राजकीय पक्षांना आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे. आता कोणते पक्ष आमच्या पाठी उभे राहतात ते पाहू, दुसऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी आमच्यावर किती दिवस अन्याय करणार? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
हेही वाचा…“ते तुम्ही सिद्ध केलं तर राजकारणातून निवृत्त होईल”, अजित पवारांनी दिलं चॅलेंज
हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला, बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी पवारांची मोठी रणनिती
हेही वाचा…“आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार”