पुणे : शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे, शब्द देताना एकदा, दोनदा नाही, लाख वेळा विचार करा, पण शब्द दिल्यावर प्राण जरी गेला तरी शब्द पडू द्यायचा नाही. असंही ठाकरेंनी म्हटलं. वल्लभभाईंची जी उंची आहे, त्याच्या आसपास ही तुम्ही पोहचू शकत नाही. तुम्ही कसेल पोलीदीपुरूष? तुम्ही तर तकलादू पुरूष. असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार, आज सर्वपक्षीय ‘या’ २३ नेत्यांची एकत्रित बैठक
उद्धव ठाकरे किती रडत आहेत. प्रत्येक ठिकाणी पुन्हा पुन्हा तेच रडगाण करीत आहेत. एकाबाजूला संपुर्ण जगानं मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे त्यांचा जळफळाट जळगावच्या सभेत दिसला आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचा वारसा पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. जे ७० वर्षात कोणी करू शकलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. असं चित्रा वाघ म्हणाल्या.
हेही वाचा…“किती पापं लपवली, कशामुळे गेलात, हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही” वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक टोला
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, पोलादी पुरूषाचं हे लक्षण आहे. हा पुरूषार्ध आणि तुमचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यात आहे. पत्राचाळीतील भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्यात, बीएमसी लुटण्यात आहे. तुमचा पुरूषार्थ मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आहे. तुमच्या पुरूषार्थाच्या कथांची यादी न संपणारी आहे. असंही म्हणत त्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्रातले सगळे सध्या राजकारणी सत्तेला भूकेले, आग लावायची कामं सुरू,” मराठा आरक्षणावरून खोतांची टिका
हेही वाचा…अजित पवार गटातील विधान परिषदेतील ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून धंगेकरांची फडणवीसांवर जोरदार टिका, म्हणाले, घोषणा केल्या पण…,
हेही वाचा…“मराठा आरक्षण नाही तर शिक्षणही नाही, गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय”
हेही वाचा…जी-२० परिषदसाठी भारताने इतर देशापेक्षा केला प्रचंड खर्च, रशियाने फक्त 170 कोटीत आटोपला होता कार्यक्रम