मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांची एक टीम देखील अंतरवाली सराटे गावात पोहचली आहे. परंतु उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांनी नकार दिला आहे. मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद आहे. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. यातच आता जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही असा निर्णय एका गावाने घेतला आहे. मराठा आरक्षणावरून आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टिका केली आहे.
हेही वाचा…“किती पापं लपवली, कशामुळे गेलात, हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही” वडेट्टीवारांचा अजित पवारांना खोचक टोला
मनोज जरांगे पाटील यांनी विनंती आहे की संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतो. त्यांनी चर्चेचे दरवाजे खुले ठेवावेत. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. जरांगे पाटील यांना हात जोडून विनंती आहे की त्यांची मागणी सरकार आणि समाजापर्यंत पोहचली आहे. मनोज जरांगे पाटलांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. जीव धोक्यात येईल असा टोकाचा पाऊल उचलू नये. आज महाराष्ट्रातले सगळे राजकारणी सत्तेला भूकेले आहेत. त्यामुळे सगळे आग लावायला लागले आहेत. अशी टिकाही त्यांनी केलीय.
हेही वाचा…Breaking News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!
दरम्यान, जालना येथील मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून वसमत तालुक्यातील अकोली येथे आंदोलन सुरू आहे. येथील गावकऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुणीही शाळेत जाणार नाही असा निर्णय येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. मात्र, एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. त्याचबरोबर गावातून बाहेर गावी शिकायला जाणारे विद्यार्थीही गावातच आंदोलनाठिकाणी बसून होते.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटातील विधान परिषदेतील ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार, शरद पवार गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…मराठा आरक्षणावरून धंगेकरांची फडणवीसांवर जोरदार टिका, म्हणाले, घोषणा केल्या पण…,
हेही वाचा…“मराठा आरक्षण नाही तर शिक्षणही नाही, गावकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय”
हेही वाचा…जी-२० परिषदसाठी भारताने इतर देशापेक्षा केला प्रचंड खर्च, रशियाने फक्त 170 कोटीत आटोपला होता कार्यक्रम
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार, आज सर्वपक्षीय ‘या’ २३ नेत्यांची एकत्रित बैठक