मुंबई : शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सुरू होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ही सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेची सुनावणी येत्या 14 तारखेपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस, ठिक १२ वाजता ‘या’ दिवशी होणार सुनावणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या अपक्ष आमदारांवर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे. उद्धव ठाकरे गटाने अपक्ष आमदार बच्चू कडू, नरेंद्र बोंडेकर, राजेंद्र यड्रावरकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या निशाण्यावर अपक्ष आमदार देखील आले आहेत. यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत काय निर्णय देणार ते पाहणं महत्वाचं आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा पुरूषार्थ तर कोविड घोटाळ्यात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यात”, चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
दरम्यान, शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादीत देखील फुट पडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या २४ आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका निवडणुक आयोगात दाखल केली आहे. त्यामुळे राज्यात आता पक्ष फुटप्रकरण चांगलेच गाजत असून शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रकरण देखील आगामी काही काळात चर्चेत येण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत, उपोषण मागे घ्या,” संभाजी भिंडेंची मागणी
हेही वाचा…अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई, कोर्टात टिकणारं आरक्षण, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…खोतकर, भुमरेंची जरांगेंसोबत चर्चा, जरांगे पाटील आज उपोषण मागे घेणार ?
हेही वाचा…“बावनकुळेंची तुलना अॅम्ब्रोज सोबत,” भाजपकडून जाधवांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा..चंद्रकांत पाटलांना हटवा अन् अजितदादांना अध्यक्ष करा; मराठा आरक्षणाच्या बैठकीत नेत्यांचा सूर!