मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारलेला ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. कोल्हे हे लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेंना हिरो बनवण्याचं काम करु नये, असंही पटोले म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
खासदार अमोल कोल्हेंचा नथुराम गोडसे वादाच्या भोवऱ्यात; आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
“अमोल कोह्ले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते फक्त कलाकार नाहीत. विशेष करुन गोडसेच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघात व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखं आहे. अशा प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचं आहे. या देशाला फक्त महत्वा गांधींचाचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेलं आहे,” असं नाना पटोलेंनी या चित्रपटाला विरोध करताना म्हटलं आहे.
गोळ्या खायची वेळ आली तर पहिले मी खाईल; रेल्वेच्या नोटिसीवरून खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक
“गोडसे प्रवृत्तीने देश तुटेल. म्हणूनच अशा विघातक विचाराला हिरो बनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो,” असंही नाना पटोले म्हणाले. त्याच प्रमाणे हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही असंही नाना पोटेलेंनी म्हटल्याचं आहे. शरद पवारांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशी मागणीही नाना पटोलेंनी केलीय.
Read also:
- कोल्हेंच्या नथूराम गोडसेंवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच मतं काय? जयंत पाटील म्हणतात…
- अमोल कोल्हेंचा नथुराम गोडसे वादात; भाजपकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- नथुराम गोडसेंची भूमिका: शरद पवारांकडून खासदार अमोल कोल्हेंच समर्थन… म्हणाले…
- अमोल कोल्हेंच्या भूमिकेतून नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण होऊ नये – बाळासाहेब थोरात
- भाजपपाठोपाठ शिवसेनेचीही गोव्यासाठी यादी जाहीर; प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार