मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आगामी चित्रपटात नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. परंतु त्यांच्या या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. कोल्हे यांच्या या निर्णयावर सोशल मीडिया, राजकीय नेते आणि कार्यकर्ते टीका करीत आहेत.
उत्पल पर्रिकरांना भाजपकडून तिकीट देत होतो, पण…; देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण
परंतु ‘पडद्यावरील भूमिका आणि राजकीय भूमिका यात गल्लत करू नका,’ अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून येत्या महिनाअखेरीस तो ओटीटीवर (ओव्हर द टॉप) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा झेंडा हसन मुश्रीफांच्या हाती; उपाध्यक्षपदी कोण?
राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा 45 मिनिटाचा सिनेमा आहे. तो प्रदर्शित होत आहे असं मला समजलं. अमोल कोल्हे आज मला भेटले. तासभर आमची चर्चा झाली. ते पुण्यात एक प्रकल्प राबवत आहे. त्यावर चर्चा झाली. त्यांनी मला एक क्लिप दाखवली. त्यात ते गोडसेची भूमिका साकारत आहेत. अमोल कोल्हेंची खरी ओळख ही अभिनेता म्हणून आहे. ते लोकप्रिय आणि गुणी अभिनेते आहेत. अभिमान वाटावा असे कलाकार आहेत. त्यांची संभाजी मालिका सर्वजण पाहात असतात. अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. गोडसेंचा रोल केला असला तरी अभिनेत्याच्या अँगलने त्याकडे पाहिलं पाहिजे. ते कलावंत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कलेच्या भूमिकेतून पाहा, असं आवाहन टोपे यांनी केलं.
Read also:
- खासदार अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेंना राष्ट्रवादीचाच विरोध; मंत्री आव्हाडांनी दिला इशारा
- नाशिक महापालिकेत ८०० कोटींचा घोटाळा; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फोडला मोठा बॉम्ब
- हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव; शिवसेना – भाजपात जुंपली
- हे ‘नथु’राम… खासदार अमोल कोल्हे यांचे “चिंतन”; सर्वकाही दिल्लीतील तख्तासाठी!
- राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप