पणजी : गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्या आणि प्रचाराला जोर आला. गोव्यात कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला कुठून निवडणुकीच्या मैदानात उतरवणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. गोव्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण तसं घडताना दिसत नाहीये. त्यामुळे भाजपने उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारून योग्य केलं नाही अशी टीका इतर पक्षांनी केली. पण या संदर्भात आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.
ज्योशुआ डिसोझा हे लोकाभिमुख आमदार, जनतेने त्यांना पुन्हा निवडून द्यावे – प्रिया मिशाळ
आम्हाला मनोहर पर्रिकर यांच्याविषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असोत किंवा दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यात परिवारातील कोणताही सदस्य असो, ते सर्व जण आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणेच आहे. ते सर्व जण आमचे अगदी जवळचे आहेत”, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
Sitting MLA has been given ticket from Panjim…Utpal Parrikar (former Goa CM Manohar Parrikar's son) & his family are our family. We gave 2 more options to him but he rejected 1st one, 2nd option being discussed with him. We feel that he should agree…: Devendra Fandvais, BJP pic.twitter.com/mHoiF4yMYP
— ANI (@ANI) January 20, 2022
आम्हाला मनोहर पर्रिकर यांच्याविषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असोत किंवा दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यात परिवारातील कोणताही सदस्य असो, ते सर्व जण आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणेच आहे. ते सर्व जण आमचे अगदी जवळचे आहेत”, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
Read also:
- मोठी बातमी: सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
- गोव्यातील भाजपची पहिली यादी जाहीर; प्रमोद सावंत साखळीतून, डिसोझा म्हापशातून लढणार
- गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे काम पूर्णत्वाला नेण्याचं काम भाजप करत आहे – देवेंद्र फडणवीस
- शिवसेना खचवून राष्ट्रवादीचा फायदा करून देण्याचा घाट घातला जातोय; आमदार योगेश कदमांचा घरचा आहेर
- गोव्यात शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही; खासदार संजय राऊतांचा विश्वास