मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडाला होता. यामध्ये काही ठिकाणी मोठ्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता नगरपंचायतीचे सगळे निकाल हाती लागले आहेत. निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीच्या भाऊला भाजपच्या ताईचा धक्का; बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूरवर पंकजा मुंडेचे वर्चस्व
भारतीय जनता पक्ष हा नगरपंचातीच्या निवडणुकीत क्रमांक एकच पक्ष ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, अपक्ष असे क्रमाक्रमाने आहेत. शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री असतानाही शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याने आता शिवसेनेने आत्मचिंतन करावे असा खोचक सल्ला भाजपकडून देण्यात आला आहे.
राणे पिता-पुत्रांना कुडाळच्या जनतेनं जागा दाखवून दिली; निकालानंतर आमदार वैभव नाईकांचा प्रहार
एवढंच नाही तर शिवसेनेला स्वपक्षीय आमदाराने घरचा आहेर दिला आहे. दापोली-मंडणगड विधानसभा क्षेत्राचे आमदार योगेश कदम यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी अनिल परब विरुद्ध माजी मंत्री रामदास कदम यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याचेच पडसाद आता दापोली-मंडणगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले आहे. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढवण्याचं काम शिवसेना नेत्यांकडून सुरु आहे असा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
यश मिळविण्यासाठी सत्ताधारी कमी पडले, जनतेची पहिली पसंती भाजपला – पंकजा मुंडे
दापोलीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली आहे तर मंडणगड मध्ये योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली उभे केलेले ८ उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा फायदा दापोलीमध्ये झाला आहे. दापोलीमध्ये निवडणून आलेले काही शिवसेनेचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेने आता आत्मचिंतन करावं असा घरचा आहेर आमदार योगेश कदम यांनी दिला आहे.
Read also:
- गोव्यात शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही; खासदार संजय राऊतांचा विश्वास
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक शिवसेना लढवणारच; खासदार संजय मंडलिकांच्या घोषणेने काँग्रेस चिंतेत
- राज्यातील नगरपंचायतीचा निकाल म्हणजे राष्ट्रवादीची भरभराट तर शिवसेनेची पीछेहाट; दरेकरांचा सेनेला टोला
- ज्योशुआ डिसोझा हे लोकाभिमुख आमदार, जनतेने त्यांना पुन्हा निवडून द्यावे – प्रिया मिशाळ
- म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्णत्वास, मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क – ज्योशुआ डिसोझा