बीड : नगरपंचायत निवडणुकांमध्ये सत्ताधारी कमी पडले आहेत. बीडमध्ये लोकांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. राज्यातही नागरिकांनी भाजपला साथ दिली आहे. बीडमध्ये ज्या नगरपंचायतीच्या निवडणुकी होत्या त्या सर्व नगरपंचायतीत भाजपला बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांचं, जनतेचे आभार मानते आणि अभिनंदनही करते. तसेच, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करते, असंही त्या म्हणाल्या.
भाजपच्या राम शिंदेंना रोहित पवारांचा धक्का; कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
“बीडमधली लढत ही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे नव्हती. बीड मध्ये जो निकाल लागला आहे तो गेल्या अडीच वर्षांपासूनच्या कामकाजावरील लोकांचा राग-रोष आणि आमच्या काळातील कामावरील विश्वासामुळे आहे. त्यामुळे भविष्यातील निवडणुका कशा असतील याचं चित्र बीड जिल्ह्यातील लोकांनी दाखवलं आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
केंद्रिय मंत्री भारती पवारांच्या मतदारसंघात शिवसेनेचा बाण; भाजपला ‘जोर का’ झटका
“बीडमध्ये भाजप सोडून एकसंघ असा कुठलाही पक्ष नाही. आमदारांचा एक एक मतदार संघाचा ठेका आहे. त्यापलीकडे ते कुठल्याही जिल्ह्याच्या भविष्यासाठी हस्तक्षेप करत नाही. हेच पालकमंत्रीही करतात. जिल्ह्याचा सर्वांगिन विकास, जिल्ह्याचा कार्यकर्ता असा विचार करणारा नेता बीडमध्ये नाही. त्यामुळे हा निकाल आलाय”, असा टोलाही त्यांनी लगावला. “मुळात भाजप ही विरोधात नाही. जनतेने भाजपला सत्ता स्थापनेचा जनादेश दिला. भाजप या राजकारणामुळे विरोधी पक्ष म्हणून आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
Read also:
- राणे पिता-पुत्रांना कुडाळच्या जनतेनं जागा दाखवून दिली; निकालानंतर आमदार वैभव नाईकांचा प्रहार
- राष्ट्रवादीच्या भाऊला भाजपच्या ताईचा धक्का; बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूरवर पंकजा मुंडेचे वर्चस्व
- काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच कमळ फुललं; कडेगांवात मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का
- आर. आर. आबाच्या पोरानं मैदान गाजवलं; कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विरोधकांना दाखवला ‘कात्रजचा घाट’
- देहूनगरीत राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंची जादू; पहिल्याच निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसचा सुपडा-साफ