नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायतीचा पूर्ण निकाल हाती आला आहे. येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना आपल्याच मतदार संघात जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेनेचा बाण सर्वात उंच गेला आहे. दुसऱ्या स्थानावर म्हणजेच ५ जाणांवर राष्ट्रवादीचे घड्याळ टिक-टिक करत आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते. त्यामुळे, दिंडोरीत गुन्हा महाविकास आघाडी बघायला मिळणार का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुट्टी नाहीच; न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही डॉ. भारती पवार यांनी लाखांच्या घरात मते मिळवली होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादीत योग्य सन्मान न मिळाल्याने भारती पवार नाराज होत्या.
पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; आमदार रोहित पवारांनी केली मोदींची पाठराखण
दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक त्यामुळे डॉ. भारती पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्या मतदारसंघातही तळ ठोकून होत्या. येथे नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी सहा जागा शिवसेनेने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला चार आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीही एकत्र आले, तर नगरपंचायत त्यांच्या ताब्यात राहू शकते. विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडून येणाऱ्या पवार यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
असे आहे आजचे चित्र
– एकूण जागा – 17
– शिवसेना – 6
– राष्ट्रवादी – 5
– भाजप – 4
– काँग्रेस – 2
– इतर(अपक्ष) – 00
Read also:
- भाजपच्या राम शिंदेंना रोहित पवारांचा धक्का; कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
- नाना पुणे भाजपा स्वागतासाठी उत्सुक; पटोलेंच्या विरोधात पुण्यात जोरदार बॅनरबाजी
- पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
- जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही?
- शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, नाना पटोले तुमचे हात सांभाळा; अनिल बोंडेंचा इशारा