पुणे : काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकतेच नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते.
नाना पटोलेंना मोदींबद्दलच वादग्रस्त वक्तव्य भोवणार? भाजपची पोलिसांत तक्रार दाखल
भंडारा जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा प्रचार सुरु आहे. यावेळी एका प्रचारसभेला संबोधित करत असताना नाना पटोले यांनी थेट मोदींना मारायची भाषा केली. मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे.
भाजप आमदाराचा निष्काळजीपणा; कोरोना पॉझिटीव्ह असताना आंदोलनात सहभाग
आता भारतीय जनता पक्षाकडून नाना पटोलेंच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांकडून नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. नानाजी तुम्ही कधी पुण्याला येणार आहात ? पुणे भाजपा आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे.
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले – अमृता फडणवीस
आम्ही कसं स्वागत करतो हे एकदा आपल्या सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जितुहीनला विचारा असं म्हणत एक प्रकारे पटोलेंना आव्हान देण्याचं काम पुणे भाजपकडून करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर नाना पटोलेंविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भंडारा, नाशिक अमरावती, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये पटोलेंच्या विरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंच्या अटकेची देखील मागणी केली आहे.
Read also:
- पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
- जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही?
- शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, नाना पटोले तुमचे हात सांभाळा; अनिल बोंडेंचा इशारा
- पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; आमदार रोहित पवारांनी केली मोदींची पाठराखण
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुट्टी नाहीच; न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला