कर्जत : कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुट्टी नाहीच; न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला
17 जागा असलेली कर्जत नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 13 जागांवर मतदान 22 डिसेंबरला पार पडलं तर उर्वरीत 4 जागांसाठी काल मतदान झालं. गेल्या वेळी 13 जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली होती तर भाजपच्या दुसऱ्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 11 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
जिल्हा – अहमदनगर
नगरपंचायत – कर्जत
निकाल–
भाजप-2
राष्ट्रवादी– 12
काँग्रेस– 3
Read also:
- नाना पुणे भाजपा स्वागतासाठी उत्सुक; पटोलेंच्या विरोधात पुण्यात जोरदार बॅनरबाजी
- पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
- जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही?
- शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, नाना पटोले तुमचे हात सांभाळा; अनिल बोंडेंचा इशारा
- पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे चुकीचे; आमदार रोहित पवारांनी केली मोदींची पाठराखण