बीड : बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रतिष्ठितांना धक्का देत निर्णायक निकाल हाती आले आहेत. आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का समजला जात असून स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी बाजी मारली आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे भाजपला एक मोठा धक्का समजला जात आहे.
नाना पुणे भाजपा स्वागतासाठी उत्सुक; पटोलेंच्या विरोधात पुण्यात जोरदार बॅनरबाजी
निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना सणसणीत टोला लगावला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता असून देखील यश मिळवणं कठीण झालंय. भाजपला लोकांनी चांगली साथ दिली आहे. बीडमध्ये सर्व नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतायत तशी लढत नव्हती, बीड जिल्ह्याच्या गेल्या अडीच वर्षातील लोकांचा रोष आणि अपेक्षांचं निकाल आहे.
आष्टी नगरपंचायत
भाजप – 13
राष्ट्रवादी – 02
काँग्रेस – 01
अपक्ष – 01
एकूण – 17
…………………………………………………..
शिरूर कासार नगरपंचायत
भाजप – 11
राष्ट्रवादी – 04
शिवसेना – 02
एकूण – 17
…………………………………………………..
वडवणी नगरपंचायत
भाजप – 08
राष्ट्रवादी – 06
राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी – 03
एकूण – 17
………………………………………………
केज नगरपंचायत
राष्ट्रवादी – शेकाप – 05
काँग्रेस – 03
जनविकास आघाडी – 08
अपक्ष – 01
एकूण –
………………………………………………..
पाटोदा नगरपंचायत
भाजप – 09
भाजप पुरस्कृत – 06
महावि – 02
एकूण – 17
Read also:
- काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच कमळ फुललं; कडेगांवात मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का
- आर. आर. आबाच्या पोरानं मैदान गाजवलं; कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विरोधकांना दाखवला ‘कात्रजचा घाट’
- देहूनगरीत राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंची जादू; पहिल्याच निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसचा सुपडा-साफ
- केंद्रिय मंत्री भारती पवारांच्या मतदारसंघात शिवसेनेचा बाण; भाजपला ‘जोर का’ झटका
- भाजपच्या राम शिंदेंना रोहित पवारांचा धक्का; कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता