सांगली : मागील काही दिवसांपासून राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडाला होता. यामध्ये काही ठिकाणी मोठ्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये कवठेमहांकाळ नगरपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मी २५ वर्षांचा होईपर्यंत विरोधक ठेवणार नाही असं वक्तव्यस्वर्गीय आर. आर.आबा पाटील यांचे चिरंजीव युवानेते रोहित पाटील यांनी प्रचारात केलं होतं. सर्वपक्षीय विरोधकांनी रोहित पाटलांच्या विरोधात कंबर कसली होती.
शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती, नाना पटोले तुमचे हात सांभाळा; अनिल बोंडेंचा इशारा
आज नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रतिष्ठेची लढत मानल्या जाणाऱ्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये रोहित पवार पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. विरोधकांचा संपूर्ण सुपडा साफ करण्यात रोहित पाटलांना यश मिळाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गटही त्यांच्या विरोधात काम करत असल्याची चर्चा होती. पण त्यांच्यावर मात करत रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे.
जो न्याय नारायण राणेंना, तो नाना पटोलेंना का नाही?
रोहित पाटील यांचं वय २३ वर्ष असून त्यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रचाराची धुरा सांभाळली होती. निष्ठावान कार्यकर्ते आपल्यासोबत असून मी २५ वर्षांचा होईपर्यंत कुणाला शिल्लक ठेवत नाही. निवडणूक निकालावेळी माझ्या बापाची सगळ्यांना आठवण येईल असं वक्तव्य रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान केलं होतं. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचात निकाल
- रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल -10
- शेतकरी विकास पॅनल -6
- अपक्ष -1
Read also:
- देहूनगरीत राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंची जादू; पहिल्याच निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसचा सुपडा-साफ
- केंद्रिय मंत्री भारती पवारांच्या मतदारसंघात शिवसेनेचा बाण; भाजपला ‘जोर का’ झटका
- भाजपच्या राम शिंदेंना रोहित पवारांचा धक्का; कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
- नाना पुणे भाजपा स्वागतासाठी उत्सुक; पटोलेंच्या विरोधात पुण्यात जोरदार बॅनरबाजी
- पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध