सांगली : काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या सांगलीच्या कडेगांव नगरपंचायतीवर अखेर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचं हे गाव आहे. तरीदेखील त्यांच्या पदारात या निवडणुकीत अपयश आल्याचं चित्र आहे. कडेगांव नगरपंचायतीत भाजपने तब्बल 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला अवघ्या 5 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत एका जागेवर विजय मिळवला आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
कडेगांव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता राहण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे माजी दिवंगत मंत्री डॉ. पतंगराव कदम यांची पुण्याई. पतंगराव कदम यांनी आपल्या 15 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत कडेगांवात प्रचंड विकासकामे केली. त्यामुळे त्यांच्याप्रती आत्मीयता बाळगणारा एक वेगळा चाहता वर्ग इथे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कडेगांवमध्ये हवी तशी कामे झाले नाहीत. त्याचाच परिणाम आजच्या निवडणुकीच्या निकालात प्रतिबिंब होताना दिसत आहे.
कडेगाव निकाल
भाजप – 11
काँग्रेस – 5
राष्ट्रवादी काँग्रेस – 1
Read also:
- आर. आर. आबाच्या पोरानं मैदान गाजवलं; कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विरोधकांना दाखवला ‘कात्रजचा घाट’
- देहूनगरीत राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंची जादू; पहिल्याच निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसचा सुपडा-साफ
- केंद्रिय मंत्री भारती पवारांच्या मतदारसंघात शिवसेनेचा बाण; भाजपला ‘जोर का’ झटका
- भाजपच्या राम शिंदेंना रोहित पवारांचा धक्का; कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
- नाना पुणे भाजपा स्वागतासाठी उत्सुक; पटोलेंच्या विरोधात पुण्यात जोरदार बॅनरबाजी