सिंधुदुर्ग : मागील काही दिवसांपासून राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बार उडाला होता. यामध्ये काही ठिकाणी मोठ्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये कोकणातील कुडाळ नगरपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे नाना पटोले यांना जोडे मारा आंदोलन; आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
कुडाळमध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार संघर्ष दिसून येणार होता. प्रचारामध्ये देखील एकमेकांविरोधात दोन्ही पक्षाकडून विखारी टीका करण्यात आल्या होत्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या होम ग्राउंडवर ही लढत होणार होती.
नाना पुणे भाजपा स्वागतासाठी उत्सुक; पटोलेंच्या विरोधात पुण्यात जोरदार बॅनरबाजी
आता या लढतीचा निकाल लागला असून कुडाळमध्ये भारतीय जनता पक्षाला ८ तर शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळवता आला आहे. २ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्यामुळे आता काँग्रेस या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे. भाजपच्या एका उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाल्याने भाजपला सत्तेने हुलकावणी दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या राम शिंदेंना रोहित पवारांचा धक्का; कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
कुडाळच्या मतदारांनी नारायण राणेंना व त्यांच्या मुलांना जागा दाखवली आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. काँग्रेस जरी स्वतंत्र निवडणूक लढली असली तरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करून कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसवणार असं आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
कुडाळ नगरपंचायत निवडणूक निकाल
एकूण जागा – 17
शिवसेना – 7 जागांवर विजयी
काँग्रेस – 2 जागांवर विजयी
भाजप – 8 जागांवर विजयी
कुडाळ नगरपंचायत
प्रभाग क्र. 4 बाजारपेठ (सर्वसाधारण महीला)
1) रेखा काणेकर (भाजप)
2) श्रुती वर्दम (शिवसेना) विजयी
3) सोनल सावंत (काँग्रेस)
4) मृण्मयी धुरी (अपक्ष)
प्रभाग क्रमांक 5 कुडाळेश्वर वाडी (सर्वसाधारण)
1) अभिषेक गावडे (भाजप) (विजयी)
2) प्रवीण राऊळ (शिवसेना)
3) सुनील बांदेकर (अपक्ष)
4) रमाकांत नाईक (मनसे)
5) रोहन काणेकर (काँग्रेस)
प्रभाग क्र. 6 गांधीचौक (सर्वसाधारण महीला)
1 प्राजक्ता बांदेकर (भाजप) (विजयी)
2) देविका बांदेकर (शिवसेना)
3) शुभांगी काळसेकर (काँग्रेस)
4) आदिती सावंत (अपक्ष )
प्रभाग क्र. 7 डॉ. आंबेडकर नगर (सर्वसाधारण)
1) विलास कुडाळकर (भाजप) (विजयी)
2) भूषण कुडाळकर (शिवसेना)
3) मयूर शारबिद्रे (काँग्रेस
प्रभाग क्र. 8 मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला)
1) मानसीसावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) (विजयी)
2) रेवती राणे (भाजप)
3) आफरीन करोल (काँग्रेस)
Read also:
- राष्ट्रवादीच्या भाऊला भाजपच्या ताईचा धक्का; बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूरवर पंकजा मुंडेचे वर्चस्व
- काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच कमळ फुललं; कडेगांवात मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का
- आर. आर. आबाच्या पोरानं मैदान गाजवलं; कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विरोधकांना दाखवला ‘कात्रजचा घाट’
- देहूनगरीत राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंची जादू; पहिल्याच निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसचा सुपडा-साफ
- केंद्रिय मंत्री भारती पवारांच्या मतदारसंघात शिवसेनेचा बाण; भाजपला ‘जोर का’ झटका