पणजी : देशात आता ५ राज्यांमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मतदान जरी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असलं तरी पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच कमळ फुललं; कडेगांवात मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का
महाराष्ट्रात सत्तेत असणारी शिवसेना आता भारतीय जनता पक्षाला इतरही राज्यांमध्ये कडवी झुंझ देण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये शिवसेना आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे गोव्यात जाऊन शिवसेनेचा जोरदार प्रचार करत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे हे मैदानात उतरले आहे.
राष्ट्रवादीच्या भाऊला भाजपच्या ताईचा धक्का; बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूरवर पंकजा मुंडेचे वर्चस्व
गोव्यात काँग्रेस पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सयुंक्त पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. गोव्यात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जेवढ्या जागांवर आम्ही उमेदवार देऊ तेवढ्या जागा आम्हीच नक्कीच जिंकू. एवढच नाही तर आमच्या शिवाय गोव्यातील सरकार येणार नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राणे पिता-पुत्रांना कुडाळच्या जनतेनं जागा दाखवून दिली; निकालानंतर आमदार वैभव नाईकांचा प्रहार
आया राम गया राम ही कल्पना आता इतर राज्यांनंतर गोव्यात दिसत आहे. गोव्यात काय होईल हे सांगता येत नाही इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे. अशा राजकारणाचा आणि गोव्यातील राजकीय पक्षांचा लोकांना कंटाळा आला आहे. महाराष्ट्रा तले सरकार पाहून येथील लोक आम्हाला संधी देऊन पाहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Read also:
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक शिवसेना लढवणारच; खासदार संजय मंडलिकांच्या घोषणेने काँग्रेस चिंतेत
- राज्यातील नगरपंचायतीचा निकाल म्हणजे राष्ट्रवादीची भरभराट तर शिवसेनेची पीछेहाट; दरेकरांचा सेनेला टोला
- ज्योशुआ डिसोझा हे लोकाभिमुख आमदार, जनतेने त्यांना पुन्हा निवडून द्यावे – प्रिया मिशाळ
- म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्णत्वास, मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क – ज्योशुआ डिसोझा
- यश मिळविण्यासाठी सत्ताधारी कमी पडले, जनतेची पहिली पसंती भाजपला – पंकजा मुंडे