कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या जागी आता लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारीला सुरुवात देखील केली आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच कमळ फुललं; कडेगांवात मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का
काँग्रेस पक्ष ही जागा बिनविरोध करण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना देखील आता मैदानात उतरत आहे. याबाबत खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली काल एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व माजी आमदार या बैठकील उपस्थित होते. या बैठकीनंतर कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेना ताकदीने लढवणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणारच असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीच्या भाऊला भाजपच्या ताईचा धक्का; बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूरवर पंकजा मुंडेचे वर्चस्व
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे राहिलेला आहे. यापूर्वी इथले बहुतांश आमदार हे शिवसेना पक्षाचेच होते. त्यामुळे आता याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवेल असा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला आहे. लवकरच आता हा निर्णय आम्ही मातोश्रीकडे पाठवणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. आमदार जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आणि परंपरेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे काँग्रेस पक्षाकडून आवाहन आहे. मात्र आता भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही ही या जागेवरील निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे.
Read also:
- राज्यातील नगरपंचायतीचा निकाल म्हणजे राष्ट्रवादीची भरभराट तर शिवसेनेची पीछेहाट; दरेकरांचा सेनेला टोला
- ज्योशुआ डिसोझा हे लोकाभिमुख आमदार, जनतेने त्यांना पुन्हा निवडून द्यावे – प्रिया मिशाळ
- म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्णत्वास, मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क – ज्योशुआ डिसोझा
- यश मिळविण्यासाठी सत्ताधारी कमी पडले, जनतेची पहिली पसंती भाजपला – पंकजा मुंडे
- राणे पिता-पुत्रांना कुडाळच्या जनतेनं जागा दाखवून दिली; निकालानंतर आमदार वैभव नाईकांचा प्रहार