पणजी : गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दरम्यान, बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. परंतु भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. गोव्यामध्ये भाजप आणि उत्पल पर्रीकर यांचा मुद्दा फार गाजत आहे. दरम्यान, भाजप उत्पल पर्रीकर यांना संधी देणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. भाजपनं गुरूवारी आपली पहिली यादी जाहीर केली. यामध्ये गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्णत्वास, मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क – ज्योशुआ डिसोझा
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांची ४० पैकी ३४ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे साखळी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे भाजपनं माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना मात्र पणजीतून उमेदवारी नाकारली आहे.
ज्योशुआ डिसोझा हे लोकाभिमुख आमदार, जनतेने त्यांना पुन्हा निवडून द्यावे – प्रिया मिशाळ
दरम्यान, पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी उत्पल पर्रीकर यांनी केली होती. परंतु भाजपनं पणजीतून बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी जाही करण्यात आली आहे. आता यानंतर उत्पल पर्रीकर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. “पणजीत जे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. उत्पल पर्रीकर आणि त्यांचं कुटुंब आमच्या जवळीलच आहे. त्यांना दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यापैकी एका जागेला त्यांनी यापूर्वीच नकार दिला होता. परंतु दुसऱ्या जागेसंदर्भात चर्चा सुरू आहे. भाजपनं कायमच पर्रीकरांच्या कुटुंबाचा सन्मान केला आहे,” असं ते म्हणाले.
Read also:
- गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे काम पूर्णत्वाला नेण्याचं काम भाजप करत आहे – देवेंद्र फडणवीस
- शिवसेना खचवून राष्ट्रवादीचा फायदा करून देण्याचा घाट घातला जातोय; आमदार योगेश कदमांचा घरचा आहेर
- गोव्यात शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही; खासदार संजय राऊतांचा विश्वास
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक शिवसेना लढवणारच; खासदार संजय मंडलिकांच्या घोषणेने काँग्रेस चिंतेत
- राज्यातील नगरपंचायतीचा निकाल म्हणजे राष्ट्रवादीची भरभराट तर शिवसेनेची पीछेहाट; दरेकरांचा सेनेला टोला