मुंबई : राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या सिनेमात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली. त्यावरुन राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस खासदार हुसैन दलवाई यांनी नाराजी बोलून दाखवलेली असताना मंत्री जितेंद्र आव्हाडांनीही विरोध केला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेंची भूमिका स्वीकारली ते चुकीचं आहे. कलाकाराने समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. गांधींचा खून करणाऱ्या नथुरामची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध आहे असं त्यांनी म्हटलं.
मोठी बातमी: सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी गेली २० वर्षे गांधी विरोधाच्या चित्रपटांना विरोध केला तो एक वैचारिक विरोध आहे. कुठलाही कलाकार एखादी भूमिका करतो तेव्हा ती भूमिका अंगात उतरत असते. खासदार यांनी ही भूमिका स्वीकारली हेच चुकीचं आहे. कलाकाराने समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. वर्ष कोणतेही असो विरोध हा विरोध आहे. भूमिका आणि माणूस हे वेगळं असू शकत नाही. व्यक्ती चारित्र्य साकारत असताना ते उतरतच मग ते वेगळं कसं असेल. नथुरामचा उद्दाती करणं जे करेल त्याला माझा विरोध असेल. पक्षाची यात काही घेणं देणं आहे ही वैयक्तिक भूमिका आहे. नथुराम महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत पण त्यांनी ही भूमिका स्वीकारली नव्हती पाहिजे असं त्यांनी सांगितले.
उत्पल पर्रिकरांना भाजपकडून तिकीट देत होतो, पण…; देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण
तसेच मैने गांधी को क्यू मारा ओटीटी प्लेट फॉर्मवर येतोय. त्यालाही वैचारिक दृष्टिकोनातून माझा विरोध आहे. गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका जो कोणी साकारले त्याचा आम्ही विरोध करतो. शरद पोंक्षे आणि विनय आपटे यांचं नाटक आम्ही उधळलं होतं. नथुराम गोडसे हा डाग गडद करण्याचं काम करू नये. मला विरोध करावाच लागेल. अमोल कोल्हेंशी बोललो. कोणत्याही परिस्थितीत माझी भूमिका बदलणार नाही असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.
Read also:
- नाशिक महापालिकेत ८०० कोटींचा घोटाळा; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फोडला मोठा बॉम्ब
- हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव; शिवसेना – भाजपात जुंपली
- हे ‘नथु’राम… खासदार अमोल कोल्हे यांचे “चिंतन”; सर्वकाही दिल्लीतील तख्तासाठी!
- राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप
- कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा झेंडा हसन मुश्रीफांच्या हाती; उपाध्यक्षपदी कोण?