मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिलांच्या नामकरणावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलेले दिसत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात तुतू मैमै चित्र समोर आले आहे.
शिवसेना खचवून राष्ट्रवादीचा फायदा करून देण्याचा घाट घातला जातोय; आमदार योगेश कदमांचा घरचा आहेर
मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या दोन पिल्लांची आणि वाघाच्या बछड्याचं बारसं करण्यात आलं. या पेंग्विनच्या पिल्लांची नाव काय असतील याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. ‘ऑस्कर’ आणि ‘ओरिओ’ अशी नाव त्यांना देण्यात आली आहे.
गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे काम पूर्णत्वाला नेण्याचं काम भाजप करत आहे – देवेंद्र फडणवीस
करिष्मा आणि शक्ती या वाघांच्या जोडीने जन्म दिलेल्या मादी जातीच्या बछड्याचे नाव ‘वीरा’ ठेवले आहे. पेंग्विनच्या पिल्लांच्या इंग्लिश नामकरणावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळताना दिसत आहे. मुंबईतील राणीच्या बागेतील प्रमुख आकर्षण असणाऱ्या पेंग्विनच्या पिलांचे आणि वाघांच्या बछड्याचे नामकरण करण्यात आले. यापुढे हत्तीच्या पिल्लाला ‘चंपा’ आणि माकडाच्या पिल्लाचं नाव चिवा असं नाव ठेवण्यात येतील असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांना हाणला होता.
गोव्यातील भाजपची पहिली यादी जाहीर; प्रमोद सावंत साखळीतून, डिसोझा म्हापशातून लढणार
यानंतर चित्रा वाघ यांनी देखील महापौर किशोरी पेडणेकरांना जशाच तसे उत्तर दिले आहे. ऑस्कर नावावरून चांगलीच मिरची झोंबलेली दिसत आहे. आमच्या लाडक्या किशोरी पेंग्विनकर ताईंचा चांगलाच भडका उडाला आहे अशी तिखट प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.
Read also:
- हे ‘नथु’राम… खासदार अमोल कोल्हे यांचे “चिंतन”; सर्वकाही दिल्लीतील तख्तासाठी!
- राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप
- कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा झेंडा हसन मुश्रीफांच्या हाती; उपाध्यक्षपदी कोण?
- उत्पल पर्रिकरांना भाजपकडून तिकीट देत होतो, पण…; देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण
- मोठी बातमी: सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय