– आत्मचिंतन करून २०२४ साठी भजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?
पुणे : पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेले नथुराम गोडसे यांची मुख्य भूमिका साकारून २०२४ मध्ये भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे कोल्हे आगामी काळात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
शिवसेना खचवून राष्ट्रवादीचा फायदा करून देण्याचा घाट घातला जातोय; आमदार योगेश कदमांचा घरचा आहेर
‘धर्मवीर संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारल्यामुळे अभिनेता अमोल कोल्हे यांना अफाट प्रसिद्धी मिळाली. राजकीय पटलावर सक्रिय होण्यासाठी कोल्हे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षी असलेल्या कोल्हे यांना माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव यांच्यामुळे अडथळा निर्माण झाला. त्यामुळे 2019 मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोल्हे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी 2017 मध्येच ” why I Killed Gandhi” या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. या चित्रपटात कोल्हे यांनी भारताच्या इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्व नथुराम गोडसे यांची मुख्य भूमिका साकारली आहे.
गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे काम पूर्णत्वाला नेण्याचं काम भाजप करत आहे – देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीत ‘नथुराम विचारधारा’ चालणार नाही ही बाब कोल्हे यांच्या लक्षात होती. त्यामुळे चित्रपटाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. 2017 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. 2019 मध्ये कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यानंतर सुमारे अडीच वर्षांनी कोल्हे यांनी “राजकीय आत्मचिंतन” केले. आत्मचिंतनात त्यांना साक्षात्कार झाला. मोठा राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे संकेत त्यांनी सोशल मीडियावर दिले. पण, त्यांच्या फॉलोअर्सचा भ्रमनिरास झाला. 2022 उजाडले आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केवळ 2 वर्षाचा कालावधी राहिला आहे. 2022 च्या सुरुवातीला कोल्हे यांनी अक्षरशः ” राजकीय बॉम्बस्फोट” केला.
खासदार कोल्हे यांची नियोजनबद्ध रणनीती…
राष्ट्रवादी आणि पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या कोणत्याही पक्षाचे किंवा राजकीय व्यक्तीचे समर्थन मिळणार नाही. ही बाब माहीत असतानाही कोल्हे यांनी “Why I Killed Gandhi” चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याला दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यावर निर्णयाची जबाबदारी सोडली. पण, कोल्हे आणि टीमने अत्यंत नियोजनबद्ध रणनीती आखली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे, अशी घोषणा स्वतः शरद पवार यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघ सुप्रिया सुळे यांना सोडावा लागेल, मावळ मतदार संघ पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेला सोडावा लागेल आणि काँग्रेसला पुणे आणि शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारीसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या रस्सीखेचमध्ये तिकीट कापले जाण्याची शक्यता आणि भाजपाकडे ‘सेफ’ तिकीट म्हणून पाहण्याची मानसिकता यामुळे कोल्हे यांनी याच चित्रपटाद्वारे आपला भाजपा प्रवेशाला “ग्रीनकार्ड” मिळवले. त्याला अभिव्यक्ती आणि कलावंताचे स्वतंत्र असे गोंडस पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे मिळालेली अफाट प्रसिद्धी नथुराम गोडसे यांच्या भूमिकेमुळे धुळीस मिळवली.
शिरूर मतदारसंघात भाजपामध्ये कोल्हेना ‘स्पेस’ दिसली?
शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी कोल्हे यांची पुरती नाकाबंदी केली आहे. बैलगाडा शर्यत, खेडमधील प्रस्तावित विमानतळ, पुणे- नाशिक रेल्वे, पुणे- नाशिक महामार्ग या प्रमुख मुद्द्यांवर कोल्हे यांना मतदार संघात आपले स्थान बळकट करू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोड्या लक्षात घेता भाजपामध्ये “स्पेस” आहे, ही बाब कोल्हे यांनी अचूक हेरली आहे. सध्यस्थीला शिरूरमध्ये भाजपाकडे प्रभावी चेहरा नाही. भोसरीचे आमदार महेश लांडगे प्रयत्न करीत आहेत. पण, संपूर्ण मतदार संघात बस्तान बसवणे अवघड आहे. त्यामुळे कोल्हे यांनी थेट भाजपात प्रवेश करून पुन्हा एकदा शिरूरच्या खासदारकीची “शिकार” करण्याची खुणगाठ मनाशी बांधली आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असलेले कोल्हे भाजपाची “स्क्रिप्ट” वाचू लागले आहेत, असे निरीक्षक राज्यातील राजकीय विश्लेषक नोंदवताना दिसत आहेत.
Read also:
- राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप
- कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा झेंडा हसन मुश्रीफांच्या हाती; उपाध्यक्षपदी कोण?
- उत्पल पर्रिकरांना भाजपकडून तिकीट देत होतो, पण…; देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण
- मोठी बातमी: सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
- गोव्यातील भाजपची पहिली यादी जाहीर; प्रमोद सावंत साखळीतून, डिसोझा म्हापशातून लढणार