पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 10 ते 12 जागी निवडणुक लढवणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. तसेच पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली.
राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप
शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “गोव्याच्या राजकारणात शिवसेना हा नवा पक्ष नाही. आपण गेल्या काही वर्षांपासून पाहताय, जरी काही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळालं नसलं, तरी गोव्यात शिवसेना दमदारपणे काम करतेय. गोव्यातील निवडणुका आम्ही 2017 मध्येही लढवल्या होत्या. यावेळी गोव्याचं राजकारण, गोव्याच्या निवडणुका, एकंदरीत राजकारण हे काही आशादायी दिसत नाही, सर्वांसाठीच. गोव्याच्या जनतेसाठी. वातावरण पूर्ण गढूळ झालंय. अनेक राजकीय पक्ष नव्यानं उतरले आहेत. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षाकडून निवडणुका लढत आहेत, हेदेखील स्पष्ट होत नाही.”
हे ‘नथु’राम… खासदार अमोल कोल्हे यांचे “चिंतन”; सर्वकाही दिल्लीतील तख्तासाठी!
“परवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रस पक्षासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत मी बोलताना म्हणालो, हिंदी भाषिक पट्ट्यात आयाराम-गयाराम हा शब्द प्रचलित आहे. पण गोव्याच्या बाबतीत म्हणायचं तर, आलेमाव-गेलेमाव. कारण काय, कधी कोण आले, कधी कोण गेल, कधी कोण बंड करेल, याचा काहीही नेम नाही. त्याही परिस्थितीत शिवसेना निवडणूक लढत आहे. गोव्याचं राजकारण हे गेल्या काही वर्षांत 5 ते 10 लोकांच्या मुठीमध्ये आहे. मग हे भुमाफिया, दणदांडगे आणि राजकीय घराणी आहे. यामध्ये सामान्य राजकीय कार्यकर्त्याला कोणतंही स्थान राहिलेलं नाही. इतक्या भ्रष्ट पद्धतीनं गोव्याच्या निवडणुका लढल्या जातात आणि राज्य चालवलं जातं. म्हणूनच आम्ही ठरवलंय की, या प्रस्तापितांना घरी बसवायचं असेल, तर जनतेतील सामान्यातील सामान्य उमेदवारांना उमेदवारी द्यायची, जे आम्ही महाराष्ट्रात करतो. त्यामुळे त्या-त्या मतदार संघातील सामान्य चेहरे मैदानात उतरवायचं आम्ही ठरवलं आहे.”, असं संजय राऊत म्हणाले. गोवा निवडणुकीत शिवसेना साधारण 10 ते 12 जागा लढेल. आज 9 उमेदवारांची यादी जाहीर करत आहोत. पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, परये, वारपई, वास्को आणि केपे याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Read also:
- गोळ्या खायची वेळ आली तर पहिले मी खाईल; रेल्वेच्या नोटिसीवरून खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक
- खासदार अमोल कोल्हेंचा नथुराम गोडसे वादाच्या भोवऱ्यात; आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
- खासदार अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेंना राष्ट्रवादीचाच विरोध; मंत्री आव्हाडांनी दिला इशारा
- नाशिक महापालिकेत ८०० कोटींचा घोटाळा; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फोडला मोठा बॉम्ब
- हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव; शिवसेना – भाजपात जुंपली