मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनही विरोध होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
नाशिक महापालिकेत ८०० कोटींचा घोटाळा; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फोडला मोठा बॉम्ब
दरम्यान भाजपाकडूनही यावर प्रतिक्रिया आली असून यामध्ये काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, “एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का हे त्यांनी एकदा जाहीर करावी. ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे”.
नाशिक महापालिकेत ८०० कोटींचा घोटाळा; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी फोडला मोठा बॉम्ब
पुढे बोलताना ते म्हणाले की, “अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही. सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो”.
खासदार अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेंना राष्ट्रवादीचाच विरोध; मंत्री आव्हाडांनी दिला इशारा
अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.
Read also:
- नथुराम गोडसेंची भूमिका: शरद पवारांकडून खासदार अमोल कोल्हेंच समर्थन… म्हणाले…
- अमोल कोल्हेंच्या भूमिकेतून नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण होऊ नये – बाळासाहेब थोरात
- भाजपपाठोपाठ शिवसेनेचीही गोव्यासाठी यादी जाहीर; प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार
- गोळ्या खायची वेळ आली तर पहिले मी खाईल; रेल्वेच्या नोटिसीवरून खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक
- खासदार अमोल कोल्हेंचा नथुराम गोडसे वादाच्या भोवऱ्यात; आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…