मुंबई : राज्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहरात सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट ४ टक्याच्या खाली कमी असूनही राज्य सरकारनं पुण्यातील निर्बंध जैसे थेच ठेवले आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पुण्यात सरकारनं असा निर्णय का घेतला कळत नाही. कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही फडणवीस यांनी पुणेकरांना दिला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे मेट्रोच्या ट्रायलवरुनही अमृता फडणवीस यांनी टोला लगावला आहे. त्यांच्या या टीकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दित जोरदार चपराक लगावली आहे.
कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं सांगत त्यांनी हा विषय टाळला आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, असंही पेडणेकर म्हणाल्या.
‘राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’ – संजय राऊत
लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. पत्रकार हा कोरोना संकटाच्या काळात पुढे राहून काम करत होते. त्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास मिळायला हवा, असं मतही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. दुसरीकडे पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.
Read Also :
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांसाठी १०० कोटीचा निधी मंजूर; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
- कोणी लाडका नाही, कोणी दुश्मन नाही, व्यापाऱ्यांनो, संयम सोडू नका – उद्धव ठाकरे
- ४ टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही? – अमृता फडणवीस
- घटना दुरुस्तीसाठी सोनिया गांधी, ममतादीदींना केंद्राला पत्रं लिहायला सांगा – देवेंद्र फडणवीस
- निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने प्रस्ताव पाठवावा; मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव मागितला होता का?