पुणे : महाराष्ट्रात ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात चित्र काहीसं वेगळं आहे. कारण पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्दयावर अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा अनोखा सल्लाही अमृतांनी पुणेकरांना दिला आहे.
पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…
धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला. 4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही हे कळत नाही, असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.
“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम 125 देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. 77 टक्के या कामात स्त्रिया आहेत. 7 ऑगस्ट 2015 पासून हातमागदिन साजरा केला जातो.”“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापऱ्यायच्या.”, असं उद्घाटन कार्यक्रमानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या.
मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा? चंद्रकांत पाटील घेणार लवकरच ‘राज’भेट
पुणे शहरात कोरोना रुग्ण संख्या चा दर कमी आहे. पण तरीही सद्य परिस्थितीत पुणे शहर पूर्ण सुरु नाही. पण असं असलं तरी पुणेकरांनी कोरोनाचे नियम पाळावेत आणि खूप शॉपिग करावी, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
Read Also :
- घटना दुरुस्तीसाठी सोनिया गांधी, ममतादीदींना केंद्राला पत्रं लिहायला सांगा – देवेंद्र फडणवीस
- निर्बंधाबाबत पुणे महापालिकेने प्रस्ताव पाठवावा; मुंबईला ‘खास’ सवलत देताना असा प्रस्ताव मागितला होता का?
- ‘राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे’ – संजय राऊत
- “वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?
- निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?