मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाच्या पूराचा फटका बसून अनेक नागरिकांचे आतोनात नुकसान झाले. अशा नागरिकांना मदत म्हणून सरकारतर्फे देण्यात आलेल्या आर्थिक मदतीचे चेक परत घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकते आहे.
हे पण वाचा: महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर. ; संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा
यावर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. रत्नागिरीतील पूरग्रस्तांना दिलेले चेक प्रशासनाद्वारे परत घेतल्याचे वृत्त खरे आहे. हे चेक परत घेण्यामागे कारण आहे. तसेच, प्रसारमाध्यमांतून दाखवले गेलेले वृत्त वस्तूस्थितीला धरुन नसल्याचेही परब यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा: जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
काय आहे प्रकरण?
कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचं नुकसान झालेलं आहे. सरकारने लोकांना मदतीसाठी चेक दिले होते, मात्र ते परत चेक परत घेतल्याचा आरोप अनिल परबांवर करण्यात आला होता. यावर आता अनिल परबांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी स्वत: जाऊन पोसरे गावात शासनाच्या मदतीचे चेक देऊन आलो होतो. पण गावातील काही प्रतिनिधींनी विनंती केली होती की चेक दिलेली बँक ३० किलोमीटर लांब आहे.
हे पण वाचा: ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
त्यामुळे तिथे जाण्याची आमची अडचण आहे. त्यामुळे आपण शासनाचा प्रतिनिधी आमच्यासोबत द्यावा. त्यांचे खाते नंबर शोधायचे होते. चिपळूणच्या सर्व बँका पुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधीने ते चेक परत घेतले होते. ते वटवण्याचं काम दुसऱ्या बँकेतून किंवा त्याच बँकांमधून केलं गेलं. शासनाचा प्रतिनिधीने स्वत: जाऊन सगळ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले आहेत’, असा खुलासा अनिल परब यांनी केला आहे.
Read Also :
- “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने
- पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
- जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
- ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
- मुख्यमंत्री महोदय.. असली थोतांड वक्तव्य अजून किती दिवस करणार आहातं…!