मुंबई : ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षातील नेते सातत्याने महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत असून, आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून टीका केली होती. “या सरकारमध्ये काही झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांचाच या आरक्षणाला विरोध आहे, असं काँग्रेसच्या आमदाराचंच म्हणणं आहे. त्यामुळे, ओबीसींचा कळवळा असेल, तर काँग्रेसनी सत्तेत राहू नये”, असं आवाहन त्यांनी काँग्रेसला केलं.
चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंग यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका
यावरून काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर पलटवार केला असून, “ओबीसी आरक्षण अडकण्यामागे भाजपचंच पाप आहे,” असा आरोप करत, “त्यांनी सगळं नीट केलं असतं, तर आरक्षण मिळालं असतं. आम्ही हे आरक्षण मिळवून देण्याचा कायम प्रयत्न करु. त्यासाठी आम्ही डेटा मिळवू आणि आरक्षणही देऊ”, असा दावा त्यांनी केला आहे.
“MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा”, मागणी घेऊन ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपाल दरबारी
चंद्रशेखर बावनकुळे यांनी, “ओबीसींना आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी हवं ते करा, पण ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल होऊ देऊ नका. आगामी निवडणुका या ओबीसी आरक्षणानुसारच झाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, नाहीतर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. त्यामुळे, आता हे काम सरकारने करून दाखवावं,” असं आव्हान सरकारला दिलं होतं. त्यावर वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी, राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव संमत करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणा वापरुन राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, असा ठराव सरकार समोर सादर केला जाणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून जोरदार वादंग पाहायला भाजप आणि महाविकास आघाडी मध्ये मिळणार आहे.
Read Also :
- पूरग्रस्तांना मदत : महापालिका आयुक्त राजेश पाटील अन् टीमचे आमदार महेश लांडगेंकडून कौतूक
- जबरा फॅन झालो या… नरेंद्र पाटलांनी हातावर कोरलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच नाव
- ज्यांना नीट वाचता येत नाही त्यांनी सल्ले देऊ नये; पडळकरांनी राष्ट्रवादीला पुन्हा डिवचलं
- मुख्यमंत्री महोदय.. असली थोतांड वक्तव्य अजून किती दिवस करणार आहातं…!
- मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या रहस्याचा अखेर उलगडा करण्यात NIA ला यश